नमस्कार मी आशीष फडणीस।माझ्या ब्लॉग वर तुमचे स्वागत. मला माहिती नाही मी कीती काळ हा ब्लॉग चालवू शकेन, तरी तुमच्याशी संवाद साधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. माझ्या लहानपणचे मला काही आठवत नाही, पण माझ्या आई वडिलांचे genes माझ्यामधे उतरले असावेत हे नक्की. त्या दोघांनाही झाडे, फुले पक्षी, निसर्ग अणि प्रवास यात विलक्षण रस. लहान असताना त्यांच्या बरोबर चिकार फिरलो होतो, पण एखाद्या गोष्टिबाबत crazy व्हावे असे त्या वयात काहीच वाटले नव्हते. मला आज कोणी विचारले की नक्को कोणत्या गोष्टीने मला प्रभावित केले, तर मला काही सांगता येणार नाही. ना मला त्या वेळचे काही आठवत ना मला एखादी घटना आठवत ज्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळा प्रवाह फुटला.
एक शक्यता अशी आहे की आमच्या घरामागच्या तळजाई टेकडीचा त्यात मोठा वाटा असावा. एक प्रसंग मला आठवतो एकदा मी काही मिंत्रांबरोबर टेकडी उतरून येत होतो. पावसाळ्याचे दिवस होते, सगळीकडे मस्त हिरवे गार झाले होते. संध्याकाळ होती अणि अंधार पडायच्या आधी घरी पोचायची घाई करत होतो. कॅनाल ओलांडला आणि ढगांचा कडकडाट झाला. मागे वळुन पाहिले तर एक ढग तळजाई टेकडीवर कोसळत होता. फक्त तिथेच, बाकी सगळीकडे कोरडेठाक. गंम्मत वाटली आणि हसूही आले. आणि जणु मनातले कळाल्यासाऱखा तो ढ्ग आमच्याकडे आला. आमच्यावर वर्षाव करुन तो तसाच पुढे सरकत गेला. आम्हि चिंब भिजलो होतो आणि बाकी सगळीकडे पुन्हा कोरडेठाक.
बहुरुपी बहुढंगी निर्सगाची ही पहिली झलक होती. त्यानंतर जरा वेळ मिळताच तळजाई टेकडीकडे धावु लागलो. तिथल्या पायवाटा, ढोरवाटा तर ठावकी झाल्याच पण दाट झाडीमध्ये घुसुन सगळा डोंगर विंचरून काढ्ला. संध्याकाळ, रात्र, दुपार कधीही. वेळेचे बंधन नाही. दाट धुक्याची पहाट असो वा रणरणती दुपार, तळजाईला जायला कधी कंटाळा यायचा नाही. मग फिरण्याचा विस्तार वाढू लागला आणि बहकलेल्या पावलांना वाघजाई, पर्वतीपण कमी पडू लागली आणि नजर पडली सिंहगडवर.
तुफानी आणि जबरदस्त. छातीचा भाता फुलवणारी वाट. तारुण्याचे वारे कानात शिरु लागले होते आणि रगारगातून आव्हान स्विकारायला रक्त ऊसळत होतंच. इथेही वेळेचे बंधन नव्ह्तेच. एकदा आतकरवाडीपासून पुढे आलो की माणसांची संगत नको वाटते. वारा कानात शिळ घालू लागतो, पाने सळसळ करत स्वागत करतात, खोल उष्ण श्वासोच्छवास आणि पावलागणिक ठिबकणारे घामाचे थेंब चढ्णीचे आव्हान देतच राहतात. वाटेत लिंबूपाणी घेत स्टॅमिना टिकवून ठेवत वर पोहोचलो कि घामाच्या प्रत्येक थेंबाचे सार्थक होते. वारा सुसाट अंगावर येतो, सभोतालची खेडी, पुणे शहर चित्रातले वाटायला लागते. घाम सुकवून, कपडे वाळवून वारा शरीराला थंडावून टाकतो. आता गरज असते गरम वाफाळत्या चहाची. तोंड पोळून घेत खाल्लेली भजी आणि चहा हा शरीराबरोबर मनालाही टवटवी आणतो.
किती रूपे... पावसाळी धुक्यात लपेटलेला...पावसाचे तडाखे खात ऊभ्या काळाकभीन्न कड्यासारखा...हिरवीगार शाल पांघरलेला.
ईथली हिवाळातली पहाटही सुरेख. सूर्योदयापूर्वी निघावे आणि काळोख्या थंडीतच पावले टाकावीत. वर पोचेतो सूर्यमहाराज आपल्या ऊबदार सोनेरी किरणांसह दाखल होतात. ज्या प्रसन्नतेने हा तेजोमय गोल वरती येतो त्याला तोड नाही.
इथे सुरू होते माझ्या व्यसनाची कथा. डोंगर, दर्या, तारे, आकाश, पाणी, झाडे, फुले, प्राणी.. एक का अनेक नशेची साधने. या नशेतच अनेक ठिकाणी गेलो, पावले चालतील तेवढा चाललो, मन म्हणेल त्या दिशेला सुटलो आणि थकून घरी येईपर्यंत हिंड्लो. बरोबर कोणी असले तर असले नाहीतर एकटाच. पाठीवर सॅक टाकावी आणि तंगड्या दुखेपर्यंत भटकावे. कधी रेल्वेने तर कधी बस्-ट्रकने तर कधी जीपच्या मागे उभा राहून.
बरोबर अशीच मंड्ळी. पक्षीतज्ञ किरण पुरंदरेसह पावसाळी धुक्यात, मिट्ट काळोखात रात्रभर भिमाशंकरच्या रानात अंधारात चमकणारी दिप्तिका शोधल्याची आठवण कोण विसरणार? तशीच आठवण कात्रज-सिंहगड ट्रेकमध्ये बॅटरी संपल्यामुळे मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडात केलेल्या वाटचालीची.
उमेश पवार... हा एक माणूस माझ्या अशा अनेक आठ्वणींचा साक्षीदार आहे. किंबहूना माझ्या या वाट्चलीचा श्रीगणेशा त्यानेच केला.
मांढरदेव घाटात रात्री काजव्यांनी लखलखणारे झाड्....कोकणकड्याची डोळे विस्फारून टाकणारी खोली...छातीएवढ्या गारठणक पाण्यातून केदारेश्वराच्या पिंडीभोवताली घातलेल्या प्रदक्षिणा...आणि लपकणार्या खोडाला धरत बहिरीच्या गुहेतला प्रवेश... सहज आठ्वून जातात.
अशाच काही आठवणी तुमच्याबरोबर share कराव्यात म्हणून हा लेखनप्रपंच.....
hi ,,ashish
ReplyDeletekhup mast ...keep going !!!!
dhanywad re mitra
ReplyDeleteJabardast re Ashu. Hope to read more. Photo pan edkum sahi ahe...
ReplyDeleteSundar blog lihila ahes!
ReplyDeleteapratim...agadi pratyek treker chya manatle wichar tu mention kele ahes...
good...njoy treking and keep writing :)
aish keli ahes lahaanpani! I wasted my childhood on cricket and TV. Sinhagad is my favourite destination, in monsoon especially - zhakkas vataavaranat paet pooja pan chaan hotay!
ReplyDeletehai aashu khupach chaan lihale aahe.
ReplyDelete